‘साप्ताहिक मनोहर’ माझा मित्र झाला. जीवाभावाचा मित्र. वयाने मोठा असलेला मित्र, ज्याचं बोट पकडून मी पुण्यात सेटल झालो… अनेक अर्थानं
‘मनोहर’च्या काही मुखपृष्ठकथांची शीर्षकं आजही आठवतात. ‘तरुणींना हवासा वाटणारा पण न ‘सापडणारा’ बॉयफ्रेंड’, ‘मारुतीची शेपटी ते पदमा खन्ना = होस्टेल’ ही मुलांच्या होस्टेलबद्दलची कव्हर स्टोरी, ‘आधुनिक तरुणी : परंपरागत व्रतवैकल्ये’, ‘पोरींनी लाजणे पोरांना धमाल आवडते!’, ‘कुढणाऱ्या मुली, बागडणाऱ्या मुली, उंडारणाऱ्या मुली... गर्ल्स होस्टेल’.... अशा अनेक मुखपृष्ठकथांमुळे मला पुणं सापडत गेलं.......